जनतेचा जीवासाठी माण पंचायत समितीचा धाडसी निर्णय

पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी देणार 20 लाख रुपये
Published:Apr 28, 2021 12:15 PM | Updated:Apr 28, 2021 12:15 PM
News By : Muktagiri Web Team
जनतेचा जीवासाठी माण पंचायत समितीचा धाडसी निर्णय

माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.