कराड : महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम राष्ट्र उभारणी मध्ये महिलांचे योगदान व राष्ट्राप्रती निष्ठा यासाठी उद्योगिनी फाउंडेशनच्यावतीने शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत दत्त चौक ते प्रीतीसंगम उद्यान अशी Walk For Natation हि Mini Marathon आयोजित केली आहे. या साठी कराड शहरातील विविध संस्थाच्या महिला सहभागी होणार असल्याची माहिती फाउंडेशनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. उद्योगिनी फाउंडेशन ही रजिस्टर संस्था असून, ही संस्था गेली पाच वर्षे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात एकूण 16 जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रा बाहेर दुबईमध्ये सुद्धा आमची एक शाखा कार्यरत आहे. उद्योगिनी फाउंडेशन या संस्थेमध्ये सर्व स्तरातील शिक्षित आणि अशिक्षित महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून जवळपास 26000 महिला आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत. महिलांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवणे, शासकीय योजनांची माहिती त्यांना पुरवणे, अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यासाठी वेगवेगळी ट्रेनिंग सेशन्स आयोजित करणे, कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, वेगवेगळी प्रदर्शने भरवणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे अशी कामे उद्योगिनी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत. उद्योगिनी फाउंडेशन हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे, त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीची जपणूक करत Hunger Free India Movement, Type-1 Diabetic मुलांसाठी सक्षमीकरण अभियान उपक्रम राबवीत आहे.