दरोडेखोरांची स्फोटके असलेली दुचाकी सापडली
करवडीच्या माळावर पोलिसांनी स्फोट घडवून केली नष्ट
Published:Jul 21, 2022 04:25 PM | Updated:Jul 21, 2022 04:25 PM
News By : Muktagiri Web Team
कराड तालुक्यातील करवडी गावच्या हद्दीत एका दुचाकीमध्ये स्फोटके आढळून आली आहेत. सोमवारी गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम दरोडेखोरांनी जिलेटीनच्या सहय्याने उडवण्याचा प्रयत्न केला होता. या दरोडेखोरांची ही दुचाकी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या डॉक्टर पोळच्या शेतात ही बाईक झाकून ठेवल्याची माहिती पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरूवारी सकाळी जाऊन तपासणी केली असता बाईकमध्ये जिलेटीनची स्फोटके असल्याचे आढळून आले. यावेळी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्या उपस्थितीत या दुचाकीची विल्वेवाट लावण्यात आली.