अंदोरी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रुई येथील चिमुकले भाऊ व बहिण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंब, ग्रामस्थ व पोलीस शोध घेत होते. परंतु, दुदैवाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह निरा कालव्यात व चव्हाण वस्तीजवळ सापडले. आशिष प्रशांत राणे व ऐश्वर्या प्रशांत राणे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
लोणंद : अंदोरी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रुई येथील चिमुकले भाऊ व बहिण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंब, ग्रामस्थ व पोलीस शोध घेत होते. परंतु, दुदैवाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह निरा कालव्यात व चव्हाण वस्तीजवळ सापडले. आशिष प्रशांत राणे व ऐश्वर्या प्रशांत राणे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत माहिती अशी, प्रशांत रामचंद्र राणे यांचा 4 वर्षांचा मुलगा आशिष व अडीच वर्षाची मुलगी ऐश्वर्या ही भावंडे शनिवारी सकाळ 12 वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. यानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला.
परंतु, सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे शव आढळून आले. ऐश्वर्या या अडीच वर्षाच्या मुलीचा शोध अजून सुरू होता. परंतु, तिचाही मृतदेह चव्हाण वस्तीनजिक आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत.