शुक्रवार पेठेतील त्या अतिक्रमित घराला पालिकेची नोटीस 

अतिक्रमण विभागाचा पुन्हा कागदी फार्स 
Published:May 19, 2022 05:36 PM | Updated:May 19, 2022 05:53 PM
News By : Satara
शुक्रवार पेठेतील त्या अतिक्रमित घराला पालिकेची नोटीस 

शुक्रवार पेठेतील सर्वे नंबर 73 येथील नगरपालिकेच्या जागेच असणाऱ्या एका अतिक्रमीत घराचा वाद सध्या चांगलाच गाजतो आहे. हे घर पाडण्यासाठी पालिकेचा अतिक्रमण विभाग मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गुरुवारी सकाळी तातडीने कोटेश्वर चौकात उपस्थित झाला. मात्र सदर महिला कुलूप लावून बाहेर गेल्याने कारवाई होऊ शकली नाही. येथील घराच्या मूळ मालकाला हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.