भेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली

पाच जणांवर गुन्हा दाखल
Published:2 m 1 d 10 hrs 42 min 34 sec ago | Updated:2 m 1 d 10 hrs 42 min 34 sec ago
News By : Muktagiri Web Team
भेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली

फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे