महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे.
फलटण : महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे.
सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ‘गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स’चे संचालक युवा नेते सत्यजीतराजे नाईक-निंबाळकर, आरोग्य समिती सभापती तथा वैद्यकीय समिती फ. न. प. फ. नगरसेवक सनी अहिवळे, महादेवराव माने, तुषारभैय्या नाईक-निंबाळकर, डॉ. बाळासाहेब काकडे (तात्या), पत्रकार अशोक उर्फ शक्ती भोसले, कामगार संघर्ष संघटनेचे सनी काकडे, युवा उद्योजक संग्राम अहिवळे, अक्षय अहिवळे, सागर सोरटे, नीलेश मोरे (भाऊ), मंगेश जगताप, शिवा अहिवळे, विशाल लोंढे, सूरज भैलुमे यांची उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरिष काकडे (आप्पा) यांनी सर्व रक्तदाते व प्रमुख पाहुण्यांचे तसेच फलटण मेडिकल फाउंडेशनचे आभार मानले.