फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा) एकूण किंमत रुपये 1,95,000 सह विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून 4,95,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
फलटण : फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा) एकूण किंमत रुपये 1,95,000 सह विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून 4,95,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद विकास सोनवणे अन्न सुरक्षा अधिकारी सातारा यांनी दिली आहे.
पुढील तपास एपीआय राऊळ करीत आहेत.
ही कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन राऊळ, पोउनि संदीप बनकर, पो. ना. सर्जेराव सूळ, विक्रांत लावंड, नितीन चतुर, नितीन भोसले, पो. कॉ. सुजित मेंगावडे यांनी केली.