जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.
कुडाळ : जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.
तसेच तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काहीजण विना मास्क फिरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज विना मास्क फिरणार्या नागरिकांवर महसूल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दहा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. याचबरोबर जावळी तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सोशल डिस्टन्सचा देखील फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज तालुक्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी काही जणांना जिल्हा रुग्णालयात व जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जावळी तालुक्यात नव्याने महसूल विभागात दाखल झालेलेे उपविभागीय अधिकारी टोम्पे व सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी आज रस्त्यावर विना मास्क फिरणार्या नागरिकांवर धडक मोहीम उभारली होती. विना मास्क व गर्दीचे ठिकाण दिसले की पोलिस थेट त्या नागरिकांपर्यंत पोहोचत होते आणि त्यांना थेट कारवाईचा बडगा उगारत होते.
आजपासून जावळी तालुक्यामध्ये धडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.