पोटाची भूक शमविण्यासाठी मनोरुग्णाने तोडले चितेवर जळत असलेल्या कोविड प्रेताचे लचके 

फलटण शहरातील घटना : भिक्षूक, मनोरुग्ण यांच्या पोटापाण्याचा बंदोबस्त करणे गरजेचे
Published:Apr 28, 2021 01:18 PM | Updated:Apr 28, 2021 01:18 PM
News By : Muktagiri Web Team
पोटाची भूक शमविण्यासाठी मनोरुग्णाने तोडले चितेवर जळत असलेल्या कोविड प्रेताचे लचके 

जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारून खातील, असं ऐकीवात होतं. या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृतदेहाचे लचके तोडून आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेला पाहून मन सुन्न होत आहे.