डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना भाजपचे बळ! कराड दक्षिण मतदारसंघाच्या आणि विशेषतः कराड शहराच्या विकासासाठी भाजपचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अतुलबाबांना राज्यात ओळखले जात असून, डॉ. अतुलबाबांकडून जनविकासासाठी आलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता करून, भाजपकडून त्यांना बळ दिले जात आहे. डॉ. अतुलबाबांची लोकसेवेची तळमळ बघून, कराड दक्षिणमध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधीचा वर्षाव होत असून, कराड शहर
कराड : कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या ५० कोटींच्या निधीतून कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही निर्मिती होणार असल्याने, या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. भाजपा महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्यात रखडलेल्या विकासाला पुन्हा चालना देत, नवनव्या प्रकल्पांसाठी निधीची बरसात सुरू केली आहे. विशेषतः कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांना ताकद देण्याचे धोरण राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबिलेले आहे. जनतेच्या हितासाठी आणि कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रत्येक मागणीला हिरवा कंदील दाखवीत, राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्याच आठवड्यात कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १३१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणच्या विकासासाठी भविष्यातही भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. चव्हाण यांच्याकडे केली होती. मुख्यत्वे कराड शहराच्या विकासासाठी मोठा विकासप्रकल्प मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराड शहरातील रस्ते विकासासाठी ५० कोटींच्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश सी.आर.आय.एफ. योजनेत करत ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर झालेला हा राज्यातील निवडक रस्त्यांपैकी एक रस्ता असून, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे कराडच्या या रस्त्याला आता नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या ५० कोटींच्या निधीतून कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. शिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे मॉर्निंग वॉक अथवा सायकलिंग करणाऱ्या आरोग्यहितदक्ष नागरिकांसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गाची सोय उपलब्ध होणार आहे. याशिवाय या रस्त्यावर अन्य अनुषंगिक सेवासुविधा जसे की, प्रसाधनगृह, स्वच्छतागृहे, पार्किंग स्लॉट, सायकल पार्किंग स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामुळे कराड शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.