‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले.
केळघर : ‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले.
केळघरमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी ग्रामस्थांची एक बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीत संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांनी घराबाहेर पडू नये, बाधित व्यक्तीच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात यावी. बाधित व्यक्तींना योग्य ते उपचार मिळण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असून यास सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच बबन बेलोशे, शिक्षक बँक संचालक शंकर जांभळे, ग्रामसेवक एस. एस. निर्मल, उद्योजक सचिनशेठ पार्टे, जगन्नाथ पार्टे, सचिन बिरामणे, यशवंत बेलोशे, दीपक मोरे, संदीप बेलोशे, अंकुश बेलोशे, अॅड. गणेश शेलार, बाबूराव शिर्के आदींनी यांनी चर्चेत सहभाग घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, ग्रामपंचायत ज्या उपाययोजना करेल त्याला साथ देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संपूर्ण गावात सरपंच रवींद्र सल्लक यांनी सॅनिटायझरची फवारणी केली.