दुर्गम कांदाटी खोर्यातील पिंपरी तर्फ तांब गावच्या एकता जाधव यांची प्रसूती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी बोटीमध्येच यशस्वी केली.
बामणोली : दुर्गम कांदाटी खोर्यातील पिंपरी तर्फ तांब गावच्या एकता जाधव यांची प्रसूती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी बोटीमध्येच यशस्वी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 रोजी रात्री पिंपरी गावातील महिला एकता जाधव या गरोदर असल्याने त्यांना वेदना होऊ लागल्या. खूप मोठ्या प्रमाणावर वादळ असल्याने त्यांना तापोळा आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. कसे तरी बोट वाल्याने त्यांना बामणोली पर्यंत आणले. बोट काठावर लागण्यापूर्वी डॉ. मोरे यांना बोटीवर बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना दुसरी एक प्रसूती असल्याने त्यांनी आपले इतर कर्मचारी पुढे बोटीकडे पाठवले पाठोपाठ डॉ. मोरे हे देखील बोटीकडे पोहोचले.
जाधव यांना वेदना असह्य होत असल्याने त्यांना आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. शेवटी डॉ. मोरे व पवार व पाडवी नर्स यांनी बोटीतच सदर महिलेची प्रसूती यशस्वी केली. त्यानंतर त्यांना बामणोली आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा अंतर्गत नोंदणी असलेली गरोदर माता यांची यशस्वी प्रसूती केल्याबद्दल रुग्णाच्या आजीकडून डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी वेळी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या सूचना
सदर प्रसूतीसाठी मी स्वतः डॉ. मोरे, पवार सिस्टर, पाडवी सिस्टर सर्वांनी रात्री 1.30 दरम्यान 2 किमी चालत प्रवास केला. वारा जास्त असल्यामुळे आणि रुग्ण बोटने कोयना धरणमधून येत होता. पण त्यांची बोट किनारी लागत नसल्यामुळे दुसर्या बोटीतून जाऊन तिथेच बोटमध्ये नॉर्मल प्रसूती केली. यामध्ये पाडवी सिस्टर या छउऊनर्स असून त्यांनी मदत केली त्यांनी हे माझे काम नाही असे म्हटले नाही. (कारण हे माझे काम नाही हा ट्रेंड जोरात चालू आहे म्हणून नमूद केले.) पवार सिस्टर यांनी रविवार असून सुद्धा मुख्यालयात थांबून काम करतात. यामुळे त्यांची यावेळी खूप मदत झाली. (रविवार, हॉलिडे, वेळी सर्वांनी सुट्टी घेणे साध्या खूप ट्रेंड आहे म्हणून नमूद केले, आपण बँकमध्ये काम करत नसून आरोग्य मध्ये काम करतो यासाठी). पवार सिस्टर आरोग्य सेविका मुनावळे तसेच त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज प्रा. आ. कें बामणोली, उपकेंद्र तेटली, उपकेंद्र आपटी असे आहेत वरीलआरोग्य सेविका हे पद कितेक वर्ष रिक्त असल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. (आणि त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार कितेक वर्ष राहील हे शासनाला माहिती? आज वरील नमूद केलेल्या कर्मचारी मुले आपली प्रा. आ. कें. बामणोली सारख्या दुर्गम भागाची आरोग्य यंत्रणा टिकून आहे. रात्री आम्हाला 102 रुग्णाहिका आणि बोट रुग्णवाहिका गरज होती, पण दोन्ही रुग्णवाहिका कित्येक वर्षे झाले नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.