भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. याच घटनेचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दि
लोणंद : भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. याच घटनेचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला. समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा 321 फूट लांब एवढा मोठा ध्वज फडकावण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.
या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम्च्या जयघोषाने तारकर्ली-मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता. अशाच पद्धतीने पीओके (पाक व्याप्त काश्मिर) बाबतीत देखील विजय मिळवून आनंद साजरा करण्याची संधी देण्याची भावना व्यक्त केली.
भारतीय सैन्याने दि. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानमधील पूर्वी पाकिस्तान असलेल्या आताच्या बांग्लादेशाला स्वांतत्र्य मिळवून दिले होते. त्यावेळी पासून 16 डिसेंबर रोजी दरवर्षी देशामध्ये ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. याचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे संस्थापक मार्गदर्शक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेळके, हेमंत निंबाळकर, पोनि राजेंद्र शेळके, शंभूराज भोसले, रोहित निंबाळकर, वरुण क्षीरसागर, रवींद्र धायगुडे, पंकज क्षीरसागर, तानाजी धायगुडे, अनिल क्षीरसागर, राजेंद्र काकडे आदींच्या सहकार्याने तारकर्ली-मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रामध्ये 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्य दलाला आगळावेगळा सलाम करण्यासाठी डोंगर ग्रुपचे 41 सदस्य या उपक्रमात सहभागी झाले.
तारकर्ली-मालवणच्या समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने सकाळी 7च्या सुमारास भर समुद्रात अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांच्या सहकार्याने तीन बोटी व एक स्पीड बोटद्वारे सुमारे तीन किलो मीटर आतमध्ये समुद्रामध्ये गेल्यानंतर 321 फूट लांब व 10 फूट रुंद तिरंगा ध्वज फडकावला.
या उपक्रमासाठी अॅडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांचेही सहकार्य लाभले.