‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.
कुडाळ : ‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.
पंचायत समिती जावळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक गटविकास अधिकारी सोनवणे, प्रभाग समन्वयक अल्पेश खरात, संगीता शिंदे, ग्रामसंघ पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट काम करणार्या प्रेरिका मंगल मर्ढेकर, अश्विनी धनवडे, उत्कृष्ट काम बँक सखी रोहिनी किर्वे तर उत्कृष्ट शासकीय काम करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला.