सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क राहणार

काजल देसाई : कोरोनाला रोखण्यासाठी दातेवाडीत जंतुनाशक फवारणी
Published:Apr 29, 2021 04:48 PM | Updated:Apr 29, 2021 04:48 PM
News By : Muktagiri Web Team
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क राहणार

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र, दुसर्‍या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या राणीप्रमाणे लढा देत असून आज संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क व कार्यरत राहणार,’ असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या काजल देसाई यांनी केले.