‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्यांनी घ्यावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
केळघर : ‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्यांनी घ्यावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
केळघर येथील मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मेढा येथे तहसीलदार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पालवे, शिवसेना नेते एस. एस. पार्टे, जिल्हा सरचिटणीस बाहुले, अमोल चव्हाण, सुहास अभंग, कोरेगाव तालुकाध्यक्ष पवार, उगले मोगले यांच्यासह जिल्ह्यातील तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
तहसीलदार पोळ म्हणाले, ‘कोरोना काळात मंडलाधिकारी मेमन यांनी केळघर विभागात चांगले काम केले आहे. महसूल विभागाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी योगदान दिले.’
प्रारंभी तलाठी संघाचे राज्याध्यक्ष डुबल, प्रांताधिकारी टोम्पे, तहसीलदार पोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मेमन म्हणाले, ‘1983 मध्ये महाबळेश्वर तालुक्यात सेवेस तलाठी म्हणून सेवेस सुरुवात झाली. एकूण महसूल विभागात 38 वर्ष सेवा केली. जावळी, सातारा, महाबळेश्वर, माण तालुक्यात तलाठी व मंडलाधिकारी म्हणून काम केले. माण तालुक्यात मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना सर्वांच्या सहकार्यामुळे सलग चार वर्षे उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून शासनाने सन्मान केला. अधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत राजस्व अभियानातून विविध कामे मार्गी लावली. तलाठी संघाच्या माध्यमातून ही प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले.’
या कार्यक्रमाला तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी उपस्थित होते.
सावंत यांनी सूत्रसंचालन केले. धर्मा आंबवणे यांनी आभार मानले.