सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने 100 बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्त
फलटण : सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने 100 बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सजाई गार्डन मंगल कार्यालयात उभारण्यात येत असलेल्या कोरोना केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, सहायक निबंधक सुनील धायगुडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सनी अहिवळे, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, दादासाहेब चोरमले, तुषार नाईक-निंबाळकर, राहुल निंबाळकर यांची उपस्थिती होती.
सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये साधारण दररोज 100 ते 200 रुग्ण हे कोरोनाबाधित म्हणून आढळून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाला सध्या जागेची व बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. हे लक्षात घेता सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे 100 बेड्स तयार करून लवकरच प्रशासनाकडे हस्तांतरीत करणार आहे. भविष्य काळात गरज पडली तर सजाई गार्डन येथेच अजून बेड्स आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिली.
सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हेच लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून समाजातील अजून दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केले आहे.
फलटण शहरामध्ये अजून बर्याच ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभे करणे गरजेचे आहे. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्याप्रमाणे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कोरोना केअर सेंटरसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी पुढे येऊन सजाई गार्डन येथे कोरोना केअर सेंटर सुरू करत आहेत. नंदकुमार भोईटे यांनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य असून, आगामी काळात जर गरज लागली तर अजून बेड्स हे सजाई गार्डन येथे नंदकुमार भोईटे हे उपलब्ध करून देतील, यात कसलीही शंका नाही, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केले.