यावर्षी भरपुर मोसमी पाऊस झाल्यामुळे शेतातील बाजरी,भुईमुग,कांदा,मका आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.
वरकुटे : वरकुटे व परिसरातील वाकी,माळवाडी,मोटेवाडी,रांजणी या गावांमध्ये यावर्षी भरपुर मोसमी पाऊस झाल्यामुळे शेतातील बाजरी,भुईमुग,कांदा,मका आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.
गेल्यावर्षी पिकांना पाणी नसल्याने पिके वाया गेली होती तर यावर्षी अतिपावसाने पिके वाया गेली आहेत.
दोन वर्षापासून या परिसरातील शेतकरी वर्गाला अशा बेभरवशाच्या शेतीला सामोरे जावे लागत आहे.शेतक-यांनी २०१८-१९ मध्ये आपल्या पिकांचा विमा उतरवला असतानाही पिके वाया जाऊन त्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही काहीच मिळाले नाही त्यामुळे यावर्षी शेतकरीवर्गाने पीक विमा उतरवण्याकडे पाठ फिरवली आहे.
अतिपावसाने शेतातुन पाणी वाहात असल्याने वाफसा नसल्याने पुढील पिकेही वेळेत होणार नाहीत.तर शेतात गवताचे साम्राज्य माजले आहे.