‘जावळी तालुक्यामधील ग्रामीण भागात विकासकामे पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत,’ असा विश्वास जावळी तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.
कुडाळ : ‘जावळी तालुक्यामधील ग्रामीण भागात विकासकामे पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत,’ असा विश्वास जावळी तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.
दुदुस्करवाडी (ता. जावळी) येथे सभापती यांच्या शेष फंडातून चार लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या काम उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी गिरी म्हणाल्या, ‘जावळी तालुक्यामध्ये विकासकामांची गंगा पोहोचवण्यासाठी 24 तास कार्यरत राहत आहे. सायगाव पंचायत समिती गणामध्ये जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकला होता, त्या विश्वासाला पात्र ठरून सायगाव गणाचा जास्तीत जास्त विकास करणे माझे आद्य कर्तव्य आहे. यासाठीच दुदुस्करवाडी येथे सेस फंडातून चार लाख रुपयांचे पेवर ब्लॉक बसवले आहेत.’
यावेळी ग्रामपंचायत प्रशासक व सुरेश मोरे अभिजीत दुदुस्कर, सचिन मोरे, संतोष मोरे, प्रशांत मोरे यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सभापती जयश्रीताई यांनी दुसरेवाडी गावाचा सर्व्हे करत अंतर्गत गावांमध्ये चार लाख रुपये निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष आज श्रीफळ वाढवून सुरुवात करण्याचे आदेश दिले.
यावेळी ऐन पावसाळ्यामध्ये गावातील गल्ली-बोळात होणारे चिखल व पाणी साचून होणारा डासांचा प्रादुर्भाव यातून दुदुस्करवाडी आता पेव्हर ब्लॉक बसवल्यानंतर मुक्त होणार आहे.
गावात चार लाख रुपये निधीतून बसविण्यात येणारे पेव्हर ब्लॉकमुळे गावातल्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे सभापती यांच्या विशेष फंडातून बसविण्यात येणार्या पेव्हर ब्लॉकमुळे गावातील ग्रामस्थांनी सभापती जयश्रीताई गिरी यांचे आभार मानले.