लोणंद शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून, सकाळची 7 ते 11 प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत चालू असणार्या दुकानांवर गर्दी होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही.
लोणंद : लोणंद शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून, सकाळची 7 ते 11 प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत चालू असणार्या दुकानांवर गर्दी होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक दुकाने चालू असून, लोणंद शहरात या वेळेस बाजार भरल्यासारखी गर्दी होत आहे. अत्यावश्यक सेवेत असणार्या काही दुकानांनी दुकानाच्या बाहेर चौकोन आखण्याची गरज आहे. काही दुकानांच्या बाहेर चौकोन आखले नसल्याने दुकानाच्या बाहेर झुंबड पाहायला मिळत आहे. जर सकाळच्या वेळेस अशीच जर गर्दी होत राहिली तर लोणंदला अशीच रुग्णसंख्या वाढत राहणार आहे. प्रशासनाच्या वतीने यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी लोणंद पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादा दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारे हॉटेलचालक, तसेच नियम मोडणारे व्यावसायिक व नागरिक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते.
मात्र, प्रत्यक्षात लोणंद शहरातील निर्बंध असणार्या वेळेव्यतिरिक्त चौका-चौकातून नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे ना नगरपंचायतीचे. वाढत्या कोरोनामुळे लोणंदकरांची आधीच त्रेधा उडाली आहे त्यात यामुळे आणखीनच भर पडत आहे.