लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किमी अंतर फक्त 40 तास 29 मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड बुक’मध्ये नाव नोंदण्यास पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.
लोणंद : लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किमी अंतर फक्त 40 तास 29 मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड बुक’मध्ये नाव नोंदण्यास पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.
पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. या वेळी राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांचे पंढरपूर स्टेशनचे सपोनि हर्षद गालिंदे यांचे सहकारी पोलीस ट्रस्टी यांनी अभिनंदन केले.
लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र रामचंद्र शेळके (वय 48, रा. लोणंद) व संतोष मल्हारी कोकरे (वय 40, रा. पाडेगाव) यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किलोमीटर अंतर कमीत वेळेत पायी प्रवास करून पूर्ण करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्याचा संकल्प केला होता.
त्यानुसार शुक्रवार, दि. 4 डिंसेबर रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर मंदिर आळंदी येथून माऊलींचे दर्शन घेऊन पायी चालण्यास सुरुवात केली आहे. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, ह.भ.प. फुरसुंगीकर महाराज यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या पायी प्रवासादरम्यान राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांना नितीन लाखे सहकार्य लाभले. आळंदी ते पंढरपूर या दरम्यान नीरा रनर्स, लोणंद रनर्स, भैरवनाथ डोंगर ग्रुप, लोणंद केमिस्ट असोसिएशन, आदींनी जोरदार स्वागत केले होते.
राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते लोणंद हे सुमारे 100 किलोमीटर अंतर 17 तासांत पूर्ण केले. त्यानंतरचे सुमारे 146 किलोमीटरचे अंतर सुमारे 23 तासांत पूर्ण करून विक्रम नोंदवला.
राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी दीड वर्षात 25 हाफ, फुल, अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. या शिवाय सायकलिंग, ट्रेकिंग मध्येही सहभाग नोंदवला आहे. त्यांचे लोणंद व परिसरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.