‘शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते; पण संपणार्या वाटेसोबत उगवणारी एक पहाट असते. खरा शिक्षक कोण असतो तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खर्या अर्थाने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो ते काम खर्या अर्थाने मधुकर सूर्यवंशी यांनी केले,’ असे गौरवोद्गार शिवव्याख्याते ह. भ. प. संतोष भांदिर्गे यांनी काढले.
कुडाळ : ‘शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते; पण संपणार्या वाटेसोबत उगवणारी एक पहाट असते. खरा शिक्षक कोण असतो तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खर्या अर्थाने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो ते काम खर्या अर्थाने मधुकर सूर्यवंशी यांनी केले,’ असे गौरवोद्गार शिवव्याख्याते ह. भ. प. संतोष भांदिर्गे यांनी काढले.
कुडाळ (ता. जावली) येथील महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक मधुकर वसंतराव सूर्यवंशी यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक बर्गे, वसंतराव सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, स्मिता सूर्यवंशी, प्रा. लक्ष्मण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्िंसगचे पालन करीत योग्य अंतर राखीत सेवागौरव कार्यक्रम संपन्न झाला.
भांदिर्गे म्हणाले, ‘आई-वडिलांच्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये खर्या अर्थाने आत्मविश्वास जागविणारा असतो, तो शिक्षक. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागविल्यास तो विद्यार्थी खर्या अर्थाने जीवनात यशस्वी होत असतो आणि ते काम केले आहे ते सूर्यवंशी सरांनी. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा जी उपस्थिती आहे, ती लाखमोलाची असून, यावरून समजते की सूर्यवंशी सरांचे शिक्षण देण्याचे काम किती मोठे आहे. कोकणातून आपल्या कामाचा श्रीगणेशा केला व आता आपल्या भागामध्ये त्यांचा सेवागौरव केला जात आहे, ही खर्या अर्थाने गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘निरोप घेताना अश्रू गालावर येऊ द्यायचे नसतात तर दुसर्याच्या डोळ्यात येणारे अश्रू आपण पुसायचे असतात’ असे सांगून भांदिर्गे यांनी सूर्यवंशी यांना पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण माझ्याप्रती असलेल्या स्नेह, बंधुता व प्रेमापोटी कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या ऋणात कायमच राहीन, असे सांगून आपल्या मनोगतामध्ये मधुकर सूर्यवंशी म्हणाले, ‘आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या नोकरीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसे भेटली व वेगवेगळे अनुभव आले. मला आजपर्यंत केलेल्या कामात ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. माझ्या नोकरीची सुरुवात सन 1987 मध्ये रायगड जिल्ह्यातून झाली व आज कुडाळ येथे माझा सेवागौरव होत आहे. माझ्या कुटुंबातील माझे वडील वसंतरावभाऊ, मोठे बंधू प्रा. सतीशदादा, पत्नी स्मिता, मुलगी नेहा सूर्यवंशी-पवार, मीनल सूर्यवंशी-जाधव व मुलगा मोहित यांची साथ मला कायमच राहिली, याचा मला विशेष आनंद होत आहे.’
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. महेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सूर्यवंशी यांच्या चेहर्यामध्ये कामाबाबत जी आत्मीयता आहे तसेच त्यांचे सामाजिक व वैयक्तिक कार्याबाबत कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मधुकर सूर्यवंशी व स्मिता मधुकर सूर्यवंशी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तदनंतर संपूर्ण परिवारासह केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक यांनी आपली मनोगते व्यक्त करून सूर्यवंशी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विविध शाळांचे आजी-माजी मुख्याध्यापक, आजी-माजी शिक्षक, महाराजा हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थिती होत्या.
मुख्याध्यापक प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. एम. बी. कोळी यांनी आभार मानले..
माझे पप्पा ‘सुपर कुल’ : मीनल सूर्यवंशी-जाधव
मधुकर सूर्यवंशी यांची कन्या मीनल सूर्यवंशी-जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, त्यांना खूप छंद आहेत. त्यांनी आजपर्यंत जसे शाळेमध्ये ज्ञानजर्नाचे काम केले तसेच त्यांनी आमच्या घरामध्येही वडील व शिक्षक असे दोन्हीही काम केलेले आहे. माझ्या जीवनामध्ये त्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि त्यामुळे माझे पप्पा सुपर कुल असल्याचे सांगितले.