‘जावलीच्या खोर्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने शत्रूशी दोन हात करीत स्वराज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज मेढा पोलिसांची कामगिरी देखील कौतुकास्पद असून कुख्यात गुंड गजा मारणे याला ज्या पद्धतीने पकडले तशीच कामगिरी करीत भविष्यात तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी यावर पोलिसांची करडी नजर राहून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील, यासाठी मेढा पोलीस कायम प्रयत्नशील राहतील,’ अशी आशा जयश्री गिरी यांनी व्यक्त केली.
कुडाळ : ‘जावलीच्या खोर्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने शत्रूशी दोन हात करीत स्वराज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज मेढा पोलिसांची कामगिरी देखील कौतुकास्पद असून कुख्यात गुंड गजा मारणे याला ज्या पद्धतीने पकडले तशीच कामगिरी करीत भविष्यात तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी यावर पोलिसांची करडी नजर राहून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील, यासाठी मेढा पोलीस कायम प्रयत्नशील राहतील,’ अशी आशा जयश्री गिरी यांनी व्यक्त केली.
पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला पकडण्यासाठी पुणे पोलिस जंग जंग पछाडत असताना जावली तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांच्या पोलीस कर्मचारी वर्गाने गुंड गजा मारणे याला मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी यांनी सपोनि अमोल माने व त्यांच्या सहकारी वर्गाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जावलीकर जनतेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पोलीस कर्मचारी जितेंद्र कांबळे, इम्रान मेटकरी, अमोल पवार यांचा देखील सभापती जयश्री गिरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सपोनि अमोल माने म्हणाले, ‘जावलीच्या मातीत मोठी ताकद असून, यातूनच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.’
यावेळी दत्तात्रय फरांदे, वैशाली पवार, कल्पना पवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.