सातारा लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत असणारा वाद आता मिटला आहे. महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होता. राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा केला जात होता. परंतु भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. परंतु अधिकृत घोषणा होण्यास दीर्घ कालावधी लागला. बातमी अपडेट होत आहे....