महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील होणार
राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
Published:Jul 02, 2023 01:58 PM | Updated:Jul 02, 2023 02:07 PM
News By : Muktagiri Web Team
मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
- दिलीप वळसे पाटील
- छगन भुजबळ
- हसन मुश्रीफ
- किरण लहमाटे
- सरोज अहिरे
- अशोक पवार
- अनिल पाटील
- सुनिल टिंगरे
- अमोल मिटकरी दौलत दरोडा
- अनुल बेणके
- रामराजे निंबाळकर
- धनंजय मुंडे
- निलेश लंके
- मकरंद पाटील