माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत जाधव (मामा),सरपंच माणिक जाधव,गोपाळ यळवे,हेमंत जाधव,प्रमोद पुजारी, सुधाकर जाधव,विजय जाधव,पै अजित जाधव,यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उंब्रज मधील ग्रामस्थ व्यापारी यांनी उंब्रज गावामध्ये पारदर्शक उड्डाणपूल होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे उंब्रज मधील नागरिकाचे होणारे नुकसान कुठे तरी थांबावे अशी नागरिकाची होणारी गैरसोय दूर होण्यासाठी मागणी केली
उंब्रज हे गाव कराड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 70 हजार लोकसंख्या असणारे तसेच सुमारे 50 ते 60 वाडी खेड्यांना जोडणारे मध्यमवर्ती ठिकाण असणारे गाव आहे.या ठिकाणाहून पंढरपूर राज्य मार्ग 143 गेलेला आहे तसेच कोकण परिसरातून चिपळूण मल्हार पेठ उंब्रज मार्गे शामगाव मायनी पंढरपूर कडे जाणे येण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात दळणवळण या ठिकाणाहून नेहमी सुरू असते. वीस वर्षांपूर्वी उंब्रज गावामध्ये झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी उंब्रज मधील ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही तसेच उंब्रज गावची बाजारपेठ उध्वस्त होणार नाही यासाठी उंब्रज ग्रामपंचायत सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व नेते मंडळी व ग्रामस्थांनी उंब्रज गावामध्ये पारदर्शक पूल होण्या बाबत खा.श्रीनिवास पाटील,आ.बाळासाहेब पाटील,माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली या मागणी वरून या तिन्ही लोक प्रतिनिधींनि मागणीचा पाठपुरावा करून उंब्रज गावातील पूर्व व पश्चिम भागातील सेवा रस्त्या नजीक असणाऱ्या बस स्टॅन्ड,वैद्यकीय हॉस्पिटल,बाजारपेठ महमार्गवर होणारे अपघात थांबण्या साठी त्याचबरोबर वाढती लोकसंख्या या मुळे होणारी वाहतुकीची कोंडी या सर्वाचा विचार करून उंब्रज तालुका कराड येथे पारदर्शक पुल होण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे आग्रहाची मागणी केली आहे.