विरोधकांकडून शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप

मर्ढे येथील सभेत मदनदादा भोसले यांचा घणाघात
Published:Apr 28, 2022 01:52 PM | Updated:Apr 28, 2022 02:04 PM
News By : Satara
विरोधकांकडून शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप

ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्‍यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. माझी ती तसली प्रवृत्ती नाही आणि परंपराही नाही. आता अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते करतो आहे. या अडचणींचे निर्मिक असणारे स्वत:चे आडवे जाण्याचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत, असा घणाघात मदनदादा भोसले यांनी केला.