कराड पालिकेत सत्ताधार्यांकडून विकासकामात दुजाभाव
नगराध्यक्षांसह भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांवर कुर्हाड
Published:Apr 28, 2021 11:57 AM | Updated:Apr 28, 2021 11:57 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः राजकीय द्वेषातून सत्ताधार्यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या वार्डातील चांगले असणारे रस्ते सुद्धा पुन्हा डांबरीकरण करणे,कारपेट करणे अशी कामे परत करण्यात येत असल्याचा आरोप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुमारे 3 महिन्यापूर्वी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी एक आदेश काढून सन 2020 व सन 2021 साठी प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डात प्रत्येकी 30 लक्ष रुपयांची कामे सुचवावीत असे कळवले होते.यासाठी शासनाकडून 7.50 कोटी रुपये नागरोथान मधून व 1.36 कोटी निधी दलितेतर फंडामधून मंजूर झाला होता. यानुसार प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डातील कामांच्या याद्या तयार करून त्या प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. या याद्याप्रमाणे प्रत्येक कामाचे एस्टिमेट तयार होऊन त्यास टेक्निकल मंजूरी घेतली आहे व सदर कामाच्या याद्या जिल्हाधिकार्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व बांधकाम इंजिनियर एन.एस.पवार यांनी सांगितले जिल्हाधिकार्यांकडून 7.50 कोटी रुपये नगरोत्थान मधून व 1.36 कोटी दलितेतर फंडातील निधी यामधील कामे मंजूर झाली असून या मंजूर कामांच्या याद्या नगरपरिषदेमध्ये आल्या आहेत. त्या याद्या पहिल्या असता असे दिसून आले की भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष यांच्या वार्डातील कामे कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. कराड शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सर्व वार्डातील कामे घेणे जरुरीचे होते. तरी सुद्धा राजकीय हेतूने मा.जिल्हाधिकारी सो.यांचे कार्यालयात हस्तक्षेप करून सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या संबधित असलेल्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. कराड नगरपरिषदेमधील जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या वार्डातील चांगले असणारे रस्ते सुद्धा पुन्हा डांबरीकरण करणे,कारपेट करणे अशी कामे परत करण्यात येत आहेत. पण भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षा,व नगरसेवक यांच्या वार्डातील रस्ते अत्यंत खराब झाले असताना सुद्धा सदर यादीमध्ये घेण्यात आलेले नाहीत. आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक हे कराड शहराचे नागरिक असून त्यांचे प्रभागहि कराड शहरात येत आहेत. त्यामुळे हा आम्हा नगरसेवकांवर,आमच्या प्रभागवार,व येथील नागरीकांच्यावर फार मोठा अन्याय असल्याने या अन्यायाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. प्रसिध्दी पत्रकावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, सुहास जगताप, अंजली कुंभार यांच्या सह्या आहेत.