परळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी
News By : Muktagiri Web Team
सातारा, : सातारा हा विविध पुरातन वास्तूंनी नटलेला आहे. अजिंक्यतारा, बारा मोटेची विहीर, पाटेश्वरचे मंदिर, औंधचे मंदिर, क्षेत्र माहुली येथील मंदिरे, पाटण येथील तलवार विहीर या सारख्या अनेक पुरातन वास्तू सातारा तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्येच अजून एक म्हणजे परळी येथील मंदिर, परळी गावाच्या बाहेर हे मंदिर आहे. मंदिराजवळील पटांगणात संध्याकाळी तुम्हाला मुले क्रिकेट किंवा इतर खेळ खेळताना दिसतील. इथे आहे, सातारकरांना लाभलेले एक सुंदर मंदिर.
मंदिर हे शंकराचे आहे. बाहेरून आणि आतून मंदिरात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर अंगणात एक दीपस्तंभ उभा आहे. यावरही सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर दगडाच्या काही आयताकृती टॅबलेट’ ठेवलेल्या आहेत. यावर विविध प्रकारची चित्रे अहेत. एका टॅबलेटवर वरून ते खाली पर्यंत तीन विभागणी आहेत आणि त्यावर चित्र कोरलेली आहेत. यावर पूजा करतानाचे चित्र, युद्ध सामग्री घेऊन उभे असणार्या योद्धानचे चित्र, कामसुत्राचे चित्रे व इतर चित्रे कोरलेली आहेत.
हे कोरीव काम वेळेनुसार झिजून पुसट होत चालले आहे. त्यावर बुरशी, शेवाळ व लायकेनचा थर बसलेला आहे. मंदिरा जवळील भागात इतर छोटे मंदिरे ही आहेत. पण हे मंदिरे पडलेली आहेत, आणि त्यांचा काही भाग हा झाडाझुडपानमध्ये व जमिनीमध्ये गुडूप झालेला आहे.
मुख्य मंदिर हे परिसरातील सर्व मंदिरांमध्ये मोठे आहे. त्याच्या बाहेर सुंदर नक्षीकाम केलेला एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या आत ही एक नंदी आहे. मंदिराच्या आतून जर तुम्ही मंदिराच्या छताकडे बघाल, तर तुम्हाला नागाचे फणा असलेल्या आकृती दिसतील. विशेष म्हणजे या सर्व अकृतींमधील नागाचे फणे हे छतावर उलटे आहेत. मंदिराच्या आत खांबांवर विविध आकृती कोरलेल्या आहेत व त्यांवर नक्षीकाम केलेले आहे. या नक्षीकामामध्ये तुम्हाला फुले, पाने, पक्षी आढळतील.
मंदिराच्या गाभार्यात पिंड आहे. त्यावर तांब्याची घंटा आहे. गाभार्या बाहेरील नंदीच्यावर व गाभार्याच्या आतील पिंडीवर, मंदिराच्या लशळश्रळपस/ छतावर एका आयतकृती मध्ये दुसरी आयताकृती - आकारामध्ये मांडलेली दिसेल.
हे संपूर्ण मंदिर हे दगडाचे आहे. मंदिराचा दीपस्तंभ, मंदिरातील नंदी, मंदिराचे खांब, मंदिराची छत, पिंड, सर्व काळ्या दगडांनी बनवलेले आहे. या दगडांवर कोरीव व नक्षीकाम करुन हे मंदिर उभारलेले आहे.
तुम्ही कोणास परळी येथील गावकर्याला मंदिर किती जुने आहे असे विचाराल, तर पांडवकालीन आहे ऐकायला भेटेल. मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या टॅबलेटवर जी चित्रे कोरलेली आहेत, ती दूरच्या इतर मंदिरांमध्ये ही दिसतील.
ओडिशाच्या कोणार्क सूर्य मंदिरामध्ये, मध्येप्रदेश येथील खजुराहो येथील मंदिरांमध्येही आकृती आढळतात. महाराष्ट्रा जवळील काही मंदिरांमध्ये असे कोरीवकाम आढळते. या मंदिरांचा एकमेकांशी संबंध असू शकतो, व ते एकाच शतकातील असू शकतात.
परळी येथील मंदिर जपण्याची सातारकरांवर जबाबदारी आहे. सातार्यातील इतर पुरातन स्थळे जपण्याची गरज आहे. हा आपल्याला लाभलेला एक वारसा आहे, जो जपला पाहिजे.
या पुरातन स्थळांकडे पुरातत्व विभागाने लक्ष दिले पाहिज व यांची दुरुस्ती व जपवणूक योग्य त्या विज्ञानाच्या शास्त्रीय पद्धतींनी केली पाहिजे, असे मत धैर्यशील दयाळ यांनी व्यक्त केले आहे.