राजेंद्र चोरगे यांच्या मातोश्री कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आज हॉकर्स संघटनेचे 100 सभासद यांना कर्तव्य भावनेतून धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.
सातारा : राजेंद्र चोरगे यांच्या मातोश्री कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आज हॉकर्स संघटनेचे 100 सभासद यांना कर्तव्य भावनेतून धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.
गेली अनेक वर्षे श्रीबालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे हे ट्रस्टच्या माध्यमातून रिक्षाचालक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, हॉकर्स यांमधील गरजू लोकांना निस्वार्थपणे मदतीचा हात देत आले आहेत. नुकताच त्यांना मातृशोक झाला. त्यानिमित्ताने आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिनाचे औचित्त्य साधून राजेंद्र चोरगे यांनी मातोश्री कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ गरजू, गरीब लोकांना धान्याच्या किटचे वाटप केले. याहीवर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या हाताला लॉकडाऊन काळात काम मिळाले नाही, अशा हॉकर्स संघटनेच्या 100 सभासदांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. चोरगे यांच्या या दातृत्वाबद्दल लाभार्थ्यांनी चोरगे यांचे आभार मानले.
यावेळी श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, सचिव संजय कदम, जगदीश खंडेलवाल, उदय गुजर, अर्जुन चोरगे, जगदीप शिंदे, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, संजय केंडे यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप केले. यावेळी हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, कार्याध्यक्ष संदीप माने, देवदूत फौंडेशनचे अध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर, बालाजी ट्रस्ट-हॉकर्स संघटना-देवदूत फौंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.