अभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----
News By : Muktagiri Web Team
अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा झी टॉकीजचा ’गस्त’ हा सिनेमा प्रदर्शित झालाआपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी घराचं स्वप्न स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि कोणीतरी म्हंटल आहेच की, ‘इच्छा तिथे मार्ग’ आणि असच घडलंय अभिनेत्री मोनालीसा बागल तिच्या आयुष्यात.अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे.
गेल्या वर्षी तिचा झी टॉकीजचा ‘गस्त’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाच्या निमित्ताने तिने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडिया वरचे तिचे फोटोज् देखील तिच्या फॅन्सना आवडत आहेत. सोशल मीडियावर नुकतेच तिच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव झाला कारण तिने स्व कमाईतून तिची घराची इच्छा, स्वप्न पूर्ण केले.
एवढ्या कमी वयात तिने घेतलेली उंच भरारी यासाठी तिचे विशेष कौतुक झाले पण उंच भरारी घेण्यामागे ती तिच्या कुटुंबाला श्रेय देते. मोनालिसा ही तिच्या घराच्या बाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण तिच्याकडे तिने जोडलेली, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. लवकरच मोनालिसाचे नवीन सिनेमे देखील पाहायला मिळणार आहेत.