होळ सोसायटीचा कारभार राजकारणविरहीत
News By : Muktagiri Web Team
साखरवाडी ः होळ सोसायटीचा कारभार राजकारण विरहित आहे, असे प्रतिपादन असे होळ सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सुधीर कांताराम भोसले यांनी केले.
फलटण तालुक्यातील पाच गावांची मिळून असणारी होळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सभा सोसायटीच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेसाठी सोसायटीचे चेअरमन हनुमंत भीमराव भोसले व्हाईस चेअरमन संतोष श्रीरंग भोसले महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार फलटण पंचायत समितीचे सभापती शंकरराव माडकर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साखरवाडी शाखेचे व्यवस्थापक गणेश गायकवाड कृषी अधिकारी अभिजित अनपट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात सुधीर भोसले म्हणाले, सोसायटीला 96 वर्षे पूर्ण होऊन सोसायटी शतकपूर्तीच्या वाटेवर असून संस्थेची अकरा कोटींची उलाढाल असून 67 लाख भांडवल आहे तर संस्थेचे एक कोटी रुपयांची गुंतवणूक असून सोसायटीला अ वर्ग दर्जा कायम आहे संस्था प्रगतिपथावर असल्याने सर्व सभासदांना संस्था मोठी करण्यास हातभार लावण्याचे आवाहन सुधीर भोसले यांनी यावेळी करून संस्थेच्या कारभाराविषयी संपूर्ण माहितीचा ऊहा पोह त्यांनी केला जमलेल्या सभासदांना यावेळी सोसायटीच्या मागील व भविष्यातील आर्थिक घडामोडी विषयी मार्गदर्शन करून सभासदांनी वेळेवर कर्ज घेऊन ते वेळेवर परत करून आपली आर्थिक प्रगती साधावी असेही त्यांनी यावेळी सांगून या वार्षिक सभेमध्ये सभासदांच्या शंकांचे निरसन करून सभासदांच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आले ते यावेळी त्यांनी वाचून दाखवले महानंद डेअरी चे उपाध्यक्ष डी के पवार यांनी आपल्या भाषणात सभासदांनी सोसायटीचे कर्ज घेताना सर्व बाबींचा अभ्यास करून आर्थिक देणे घेणे बाबतीत सतर्क राहण्याचा सभासदांना सल्ला दिला सभेच्या पूर्वी कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पिंपळवाडी गावातील अनिकेत फडतरे यांना सोसायटीच्या वतीने सह पालक सत्कार करून गौरवण्यात आले तसेच संस्थेने प्रकाशित केलेल्या 96 वा वार्षिक अहवाल व ताळेबंद पत्रकाचे वाटप करण्यात आले.
या वार्षिक सभेमध्ये उसाला एक रकमी एफआरपी मिळावी व बँकांनी पीक कर्जासाठी शेतकर्यांना भरघोस मदत करुन पीक कर्जाची रक्कम वाढवून देण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली यावेळी होळ सोसायटीचे मा. चेअरमन बाळासाहेब (वारकरी) भोसले पांडुरंग भोसले बाळासाहेब कुचेकर संजय भोसले सचिव राजेंद्र काकडे माऊली भोसले चंद्रकांत भोसले सुनंदा झेंडे राजाराम शिंदे साखरवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय रुपनवर निवृत्ती भोसले वसंतराव जाधव विठ्ठल सूळ तसेच संस्थेचे कर्मचारी, सभासद हितचिंतक उपस्थित होते व्हाईस चेअरमन संतोष श्रीरंग भोसले यांनी सभेचे आभार मानले.