राज्यपाल नियुक्त संभाव्य बारा आमदारांमध्ये भरत पाटील यांना स्थान द्यावे
सातारा जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी
Published:Jul 04, 2022 10:02 AM | Updated:Jul 04, 2022 10:02 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
सन १९८५ पासून प.महाराष्ट्र मध्ये विरोधकांचे बालेकिल्ल्याच्या सातारा जिल्ह्यात भाजपाचे कमकुवत रोपट्याचे रूपांतर भक्कम वृक्षामध्ये करण्यासाठी ऐन तारुण्यात तन मन धन याची तमा न बाळगता ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्यात भरत (नाना) पाटील हे नाव अग्रेसर आहे. सन १९८५ पासून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष या पदावर चांगली कामगिरी करून भाजपा प. महाराष्ट्र मध्ये प्रबळ विरोधक सातारा जिल्ह्यात असताना सुद्धा भाजपा पक्ष जिवंत ठेवला. ज्या ज्या जबाबदारी पक्षाने दिल्या त्या सर्व कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण केल्या. व त्यामुळे भाजपा पक्षास सातारा जिल्ह्यात चांगले दिवस आले. खरेतर मागील भाजपा सरकार स्थापन झाले. त्यावेळी विधानपरिषदमध्ये अथवा महामंडळ अध्यक्षपदी निवड होण अपेक्षित होते. सर्व जून्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाही खात्री वाटत होती. परंतु पक्ष निर्णय पुढे भरतजी(नाना) पाटील शिरोधार्य मानून पक्षकार्य पुढे चालू ठेवले. आता पुन्हा सत्ताबदल झाला आहे व राज्यपाल नियुक्त१२ आमदार निवड करणेची आहे तरी यावेळी तरी वरीष्ठ पक्षनेत्यांनी भरत(नाना)पाटील या कट्टर, खरया सर्वसामान्य कार्यकत्याला येणाऱ्या १२ राज्यपाल नियुक्त आमदार मध्ये संधी दयावी हिच जुने पदाधिकारी, कार्यकर्ते याची इच्छा आहे. भरत (नाना)पाटील हे देवेंद्र जी फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय व प्रदेश पातळीवर सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकारिणी यांचेबरोबर चांगले संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे आगामी राज्य पाल नियुक्त आमदार यादीत भरतजी(नाना) यांना स्थान देऊन आजपर्यंत केलेल्या पक्षकार्याचा सन्मान केला जावा अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देवेंद्र जी फडणवीस उपमुख्यमंत्री, चंद्रकांत दादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे कडे केली आहे.
एक . नंबर