बाळासाहेब देसाई कारखान्याची निवडणूक लढवणार नाही
आमचा कारखाना लवकरात लवकर उभा करणार : सत्यजितसिंह पाटणकर
Published:Jun 22, 2022 10:24 AM | Updated:Jun 22, 2022 10:24 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
देसाई कारखान्याच्या नेतृत्वाने या संधीचा फायदा घेऊन निवडणुकीत वाचलेला पैसा हा ऊस उत्पादक शेतकरी , कामगारांच्या हितासाठी वापरावा व कारखान्याची सर्वतोपरी चांगली वाटचाल करावी अशा शुभेच्छा - सत्यजितसिंह पाटणकर
पाटण शुगर केन या नव्याने सुरू होणाऱ्या साखर कारखान्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत . पाटण विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सार्वत्रिक न्याय देण्यासाठी या नव्या साखर कारखान्याची आम्ही निर्मिती करत असून आमच्या कारखान्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून याच वर्षी त्याचा पहिला गळीत हंगाम सुरू होईल . या सार्वत्रिक बाबींचा विचार करून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक न लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे . देसाई कारखान्याच्या नेतृत्वाने या संधीचा फायदा घेऊन निवडणुकीत वाचलेला पैसा हा ऊस उत्पादक शेतकरी , कामगारांच्या हितासाठी वापरावा व कारखान्याची सर्वतोपरी चांगली वाटचाल करावी अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्या .