दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास होणार नाही अशी आशा : शरद पवार
महाराष्ट्र सरकार सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल
Published:Aug 20, 2020 04:53 AM | Updated:Aug 20, 2020 04:53 AM
News By : Muktagiri Web Team
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. - शरद पवार
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी खात्री असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की, या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.
सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
यानंतर शरद पवारांनी आज ट्वीट करुन या संपूर्ण विषयावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणीती होणार नाही."