बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ.सुशांत मोहिते तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे
Published:Feb 25, 2021 08:23 AM | Updated:Feb 25, 2021 08:23 AM
News By : वाठार | सुरेश माने
ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचा बेलवडे बुद्रुक गावाच्या हितासाठी उपयोग करून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावून गावाचा सार्वगीण विकास करणार आहे. - डॉ.सुशांत मोहिते
बेलवडे बुद्रुक ता.कराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक ही अटीतटीची व चुरशीची झाली होती. माजी आ. स्व.विलासराव पाटील काका व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढविली होती.उंडाळकर व भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत दमदार कामगिरी करत बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले होते.निवडणूकीनंतर आरक्षण सोडत पार पडल्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला.आरक्षण सोडतीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने डॉ. सुशांत मोहिते यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार हे निश्चित झाले होते.कोरोना काळात डॉ.सुशांत मोहिते यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते.त्यामुळे निश्चित सर्वांच्या नजरेत डॉ.सुशांत मोहिते हेच सरपंच पदाचे दावेदार असणार असे तर्क वितर्क मांडले जात होते. ते अखेर खरे ठरले.तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड बिनविरोध झाली. पै.जगन्नाथ मोहिते , हर्षवर्धन मोहिते , संपतराव मोहिते अॅड .भारत मोहिते , ,जे.बी. मोहिते , अॅड.वसंतराव मोहिते ,पै.संभाजी मोहिते व ग्रामस्थांनी नूतन सरपंच डॉ.सुशांत मोहिते व उपसरपंच मंदाकिनी वाघमारे यांचे अभिनंदन केले.