पाडळीस्टेशन - सातारारोड येथील महिला व मतदारांचा मतदानावर बहिष्कार
Published:Jan 09, 2021 07:27 AM | Updated:Jan 09, 2021 07:27 AM
News By : सातारारोड | संदीप पवार
वारंवार मागणी करूनही या समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणून या वाँर्ड मधील महिला व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारारोड : पाडळीस्टेशन - सातारारोड, ता.कोरेगाव वाँर्ड क्रंमाक - १ मधील महिला व मतदारांनी येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाडळीस्टेशन येथील जरंडा वाँर्ड नंबर एक मध्ये गेली अनेक वर्षे झाली नागरिकांना विविध प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मुख्य म्हणजे गावातील रस्ता, दिवाबत्ती, गटारे, सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी या प्रमुख समस्या आहेत. गेली अनेक वर्षे झाली पण गावकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत ,सरपंच व लोकप्रतिनिधी यांना यश आले नाही. विकासाच्या नावाखाली फक्त चर्चा झाली. पण गावापासून विकास खुपच लांब राहिला. येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी शुक्रवार दि.१५ रोजी मतदान होणार आहे. वारंवार मागणी करूनही या समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणून या वाँर्ड मधील महिला व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असे ठणकावून महिलांनी सांगितले आहे. महिलांच्या या निर्णयामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याचा धक्का या वार्डातील उमेदवारांना बसला आहे.
ग्रामपंचायतीची सत्ता प्रशासकीय अधिकारी किंवा शासननियुक्त प्रतिनिधी यांच्याकडे सोपवल्यास गावाचा विकास शक्य होईल.