शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी जाहीर केले आहे. उद्या दोन घटनापीठाचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.