मालखेड ता.कराड येथे श्री गुरूदेव दत्त जयंती निमित्त श्री. गुरुचरित्र ग्रंथांचे वाचन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालखेड येथील श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये श्री. गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.१ डिसेंबर पासून ते ६ डिसेंबर पर्यंत सकाळी ८.३०ते ११.३० पर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन तसेच बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० ते ८.००अभिषेक व मंत्र जागर ,८.३० ते ११.३० श्री. गुरुचरित्र ग्रंथाची सांगता, सायंकाळी ४.०० ते ६.०० ग्रामस्थ भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ६ वा.५ मि.श्री.गुरूदत्त जन्मकाकाळ व फुले, सायंकाळी ७ .००ते१०.००महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्री.गुरूचरित्र ग्रंथाचे वाचन व्यासपीठ चालक कृष्णा ठोंबरे, व वाचक मंडळी तसेच ग्रामस्थ भजनी मंडळ मालखेड व ग्रामस्थ मालखेड , गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित होणार आहे. तरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.