दुचाकी स्विप्ट अपघातात तिघांवर काळाचा घाला
News By : Muktagiri Team
दहिवडी : सातारा - पंढरपुर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दि.२ रोजी दुचाकी व स्विप्ट कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चिमुरडा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला. अपघातातील तीनही मृत युवक पळशी, ता. माण येथील असल्याचे समोर आले आहेत. यामुळे पळशीसह माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, दि. २ रोजी दुपारी दिडच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात एक दुचाकी (बुलेट) व स्विप्ट क्र. एम.एच.05 व्ही. 9695 या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या धडकेत बुलेटवरील तुषार लक्ष्मण खाडे वय 22, अजित विजयकुमार खाडे वय 23 व महेंद्र शंकर गौड वय 21 यांचा तिघांचा जागीच मृत्यु झाला. तसेच स्विप्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे वय वर्ष 28 व त्यांच्या बाजुला बसलेले आनंदराव ढेंबरे वय वर्ष 61 हे दोघेजण गंभिररित्या जखमी झाले असुन जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याच स्विप्टमध्ये चालक गणेश याचा मुलगा वय वर्ष 5 हा आश्चयकारकरित्या बचावला. या अपघातात बुलेटवरील एकजण उडुन समोरुन येणाऱ्या क्रुजर गाडीच्या काचेवर जावुन पडल्याने क्रुजरच्या (एम.एच. 13 ए.सी. 1749) समोरील काचेचा चुराडा झाला. अपघात इतका भिषण होता बुलेट विरुध्द दिशेला जवळपास 300 फुट फरफटत गेली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. हे ठिकाण हे अपघातक्षेत्र बनले असून या ठिकाणी वेगप्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज असल्याचेही नागरीकांनी व्यक्त केले. अपघातातील जखमी आनंदराव ढेंबरे हे ठाणे पोलीस दलातुन सेवामुक्त झाले आहेत तर त्यांचा मुलगा गणेश हा गावी दिडवाघवाडी येथे आपल्या पत्नी व मुलासह रहावयास आहे. त्यांची पत्नी ही त्यांच्या माहेरी पिंपरी चिचवडला असल्यामुळे हे दोघेजण पिता पुत्र त्यांना भेटुन गावी दिडवाघवाडीला परतत असताना त्यांच्यासोबत त्यांचा गणेशचा 5 वर्षीय मुलगा विहान हा सुध्दा त्यांच्यासोबत गावी निघाला होता. या भिषण अपघातात तो सुदैवाने बचावला आहे.