भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी ॲड. भरत पाटील
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः सातारा जिल्ह्यासह इतर राज्यात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी 1993 पासून कार्यरत असणारे ॲड. भरत पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवदी निवड झाली आहे. गेली तीस वर्षे सामान्य कार्यकर्ता ते विविध राज्यांच्या विधानसभेचे प्रभारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या आनंदाचे वातावरण आहे. पाटण तालुक्यातील तळमावले येथील ॲड. भरत पाटील 1993 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रीयपणे काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी पाटण तालुक्याध्यक्ष, सातारा जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभेचे उमेदवारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच राजस्थान निवडणुकीमध्ये बुंदी-कोटा, आसाम निवडणुकीमध्ये जोहराट विधानसभेची जबाबदारी, दिल्ली लोकसभा निवडणुकीमध्ये चांदणी चौक विभागाची जबाबदारी, गुजरात निवडणुकीमध्ये वडोदरा विधानसभा, गोवा निवडणुकीमध्ये अलढोना विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. पक्षातील विविध संघटनात्मक निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी, आसाम, राजस्थान, दिल्ली व गुजरात या राज्यातील सार्वजनिक निवडणुक कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग व विविध जबाबदाऱ्यार सक्षमपणे पार पडल्यामुळे त्यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.