जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

जावली तालुक्यातील प्राथमिक शिक्षिकांच्या उपक्रमाचे कौतूक
Published:Jun 06, 2021 05:04 PM | Updated:Jun 06, 2021 05:04 PM
News By : Muktagiri Web Team
जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही  इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे,  प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे  यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व