फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राईट जादू
News By : Muktagiri Web Team
फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादूकळसहश्रळसहीींट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.श्रावणी बॅनर्जीआपण कुठले रंग वापरायचे हे पूर्वी स्किन कलरवर ठरत असे. सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालत नसत. गहू वर्णीय सेमी गडद घेत, पण लाल, काळा, सफेद, गुलाबी, हिरवा रंग म्हणजे जणू गोर्या रंगांचीच मक्तेदारी. मात्र आता ही बुरसटलेली विचारसरणी बाजूला ठेवत तरुणाईचीफॅशन
निऑन कलर्सनी सजली आहेत. निऑन कलर्स इन आहेत. हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी, लाल असे चमकणारे रंग. आता लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं बंद असलं तरी झूम मिटिंगा, फेसटाइम, इन्स्टा तर सुरुच आहे.
कधी गळ्यातील बिडसचा नेकलेस, तर कधी हातातील ब्रेसलेट आणि बांगडयांच्या रूपात. तर कधी केसांवरील हेअरबँड ते मोबाईल कव्हर. अगदी उन्हाळ्यातही निऑनची चलती आहे.
लाल,काळा, गुलाबी, सफेद, सोनेरी, चंदेरी या कॉमन कलर्स सोबत आत्ता निऑन पिंक, निऑन ग्रिन, निऑन यलो, निऑन ब्ल्यू असे हेअरबँड वापरले जातात.
कानात स्टड घालायचे तरी निऑन कलर्स मागे नाहीत. रेड निऑन, ग्रिन, यलो, ब्लॅक आणि सिल्व्हर स्टडस अनेकींना आवडतात. टू-कलर्स मध्ये गुलाबी-हिरवा, लाल-पिवळा अशा आकर्षक रंगांचे कानातले छान दिसतात.
तेच गॉगलचंही.
डोळ्यांची निगा राखण्याबरोबरचफॅशनम्हणूनही गॉगलचा सर्रास उपयोग केला जातो. यातही संपूर्ण चेहराच झाकला जाईल अशा आकाराचेही गॉगल बाजारात मिळतात. यातही निऑन गुलाबी, हिरवा, लेमन, लाल, ऑरेंज अशा कलर्सची चलती आहे.
आय मेकअपसाठीही निऑन कलर्स वापरले जाऊ लागले आहेत. काळ्या रंगांचे आय लायनर लावण्याची परंपरा पुसट होत हिरवा, निळा, गुलाबी, अशा वेगवेगळ्या रंगांचे लायनर आता सुंदर दिसतात. अनेकींना आवडतात.
ट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.