आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे.
खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं तातडीनं नागपूरहून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मुंबई महापालिकेनं पुन्हा त्यांची नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. पालिकेनं राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.
नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सर्वात प्रथम समोर आलं. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांचेही कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला अमरावतीतील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पाच दिवसांनंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णलयात हलवण्यात आलं होतं. तिथंही आराम न पडल्यानं त्यांना तिथंही प्रकृतीला आराम न पडल्यानं त्यांना नागपूरमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना आयसीयूतून सर्वसाधारण कक्षामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.