कराड, दि. 24 ः कराडातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर नाका येथे त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपअधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे उपस्थित होते.
कराड शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. शहरात प्रवेश होणार्या मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अंतर्गंत मार्गावर बॅरिकेटस उभा करण्यात आली आहेत. विनामास्क व विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून सुरु असलेल्या या कामाची पाहणी शनिवारी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी केली.