धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल.
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून शनिवारी सकाळी अकरा वाजता वक्र दरवाजे व पायथा वीजगृहातून 10 हजार 350 क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. मात्र दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. रविवार दि. 16 रोजी धरणातून एकूण 25000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे धरणामध्ये शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 87 पॉइंट 68 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे गेल्या 4 तासात महाबळेश्वर येथे 61 mm तर नवजा येथे 90 mm पाऊस झाला आहे. कोयना धरणात सध्या 87.68 tmc पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल. नदीकाठच्या लोकांनी कृपया दक्षता घ्यावी, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे.