हल्लीची मुलं संवेदनशील नाहीत, भविष्याचा काही विचारच नाही, बघावं तेव्हा मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच.. त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही, अशा अनेक तक्रारी अलीकडच्या कुमारवयीन मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर मुलांच्या शिक्षणापासून, त्यांचे छंद, मैत्री, मैदानी खेळ, मनोरंजन आदी सवयी या बाबींवरही परिणाम झाल्याचे सतत ऐकायला व पाहायला मिळत आहे. मात्र, पुसेगाव सारख्या ग्रामीण भागात अशा बिकट प्रसंगातही काही मुलं संधी शोधून आपापल्या आवडी, निवडी, छंदाला जोपासताना दिसत आहेत. कोरोनाच्य
हृषीकेश पवार
पुसेगाव : हल्लीची मुलं संवेदनशील नाहीत, भविष्याचा काही विचारच नाही, बघावं तेव्हा मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच.. त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही, अशा अनेक तक्रारी अलीकडच्या कुमारवयीन मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर मुलांच्या शिक्षणापासून, त्यांचे छंद, मैत्री, मैदानी खेळ, मनोरंजन आदी सवयी या बाबींवरही परिणाम झाल्याचे सतत ऐकायला व पाहायला मिळत आहे. मात्र, पुसेगाव सारख्या ग्रामीण भागात अशा बिकट प्रसंगातही काही मुलं संधी शोधून आपापल्या आवडी, निवडी, छंदाला जोपासताना दिसत आहेत. कोरोनाच्या कठीण प्रसंगात शांत, संयमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑनलाईनच्या माध्यमातून धडे गिरवून अत्यंत कल्पकतेने नवनिर्मितीचा ध्यास घेताना अनेक मुलं, मुली दिसत आहेत.
संपूर्ण लॅाकडाऊनच्या काळात पुसेगावमध्ये बहुतांशी मुलं शालेय अभ्यासक्रमाबरोबरच चित्रकला, पाककला, नृत्य, गायन, तबला, हार्मोनियम आदी कलांमध्ये स्वतःला वाहून घेताना दिसत आहेत. शाळा, कॉलेजमधल्या अभ्यासाबरोबच आपल्या आवडत्या छंदाकडे त्यांना वेळ द्यायला बराचसा वेळ मिळत आहे. सद्य:स्थितीत बाहेर फिरणे जोखिमीचे असल्याने या मुलांकडे वेळच वेळ शिल्लक असल्याने अभ्यासाबरोबरच या कलागुणांचा देखील चांगलाच सराव होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना काळात बाहेर न फिरणे व वेळेचा सदुपयोग करण्याची संधी कोरोनाने दिली असल्याचे मत बहुतांशी मुलं व्यक्त करत आहेत.
कोरोनामुळे मुलांचे सगळेच नियोजन कोलमडल्यासारखे वाटत असले तरी काही जबाबदार पालक, मुलं अशा कठीण काळातही वेगळी वाट चोखाळताना दिसत आहेत. परिणामी, ही मुलं मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या छंदांच्या जोपासनेमुळे या मुलांची जडण-घडण उत्तम प्रकारे होत आहे. यामुळे मुलांना शैक्षणिक कौशल्याबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग भरारी मारण्याची संधी भविष्यात नक्की लाभणार यात तीळमात्र शंका नाही.
कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वांनाच सक्तीने घरी बसावे लागत आहे. या संकट काळात जवळ-जवळ सर्व व्यवहार थांबले असतानाच या कालावधीचा सदुपयोग करीत घरात बसून आपल्या नियमित अभ्यासाबरोबरच आपल्या कलांचे धडे गिरवत स्वतःला घडवत असलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या त्यांच्या गुरुजनांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आज या युवा पिढीला स्मार्टफोन व त्यात असलेल्या भन्नाट अॅप्सनी अक्षरशः वेड लावलेले असताना या मुलांनी चोखाळलेली वेगळी वाट खरोखरच कौतुकास्पद आहे.