‘युगंधरा’च्या आयुष्यात ‘अश्विनीताईं’नी पेरली प्रकाशाची फुलं..!
News By : Muktagiri Web Team
सातारा : ‘ती’ जन्मत:च अंध...तिच्या शिक्षणाचं काय होणार...‘ती’ समाजात आपलं वेगळंपण कसं निर्माण करणार, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या घरच्यांसमोर आ वासून उभे होते. पण समाजात असे काही शिक्षक आहेत, की जे मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः तन-मन-धन अर्पण करून झटतात..अशाच तंत्रस्नेही शिक्षिका अश्विनीताई क्षीरसागर यांनी बे्रल लिपीचं ज्ञान आत्मसात करून अंध ‘युगंधरा तोडकर’ या मुलीच्या आयुष्यात प्रकाशाची फुलं पेरलीत. त्यामुळं युगंधरा अश्विनीताईंच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत चमकताना
महानता कटारिया
सातारा : ‘ती’ जन्मत:च अंध...तिच्या शिक्षणाचं काय होणार...‘ती’ समाजात आपलं वेगळंपण कसं निर्माण करणार, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या घरच्यांसमोर आ वासून उभे होते. पण समाजात असे काही शिक्षक आहेत, की जे मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः तन-मन-धन अर्पण करून झटतात..अशाच तंत्रस्नेही शिक्षिका अश्विनीताई क्षीरसागर यांनी बे्रल लिपीचं ज्ञान आत्मसात करून अंध ‘युगंधरा तोडकर’ या मुलीच्या आयुष्यात प्रकाशाची फुलं पेरलीत. त्यामुळं युगंधरा अश्विनीताईंच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत चमकताना दिसेतय. त्याच तंत्रस्नेही शिक्षिका अश्विनीताई व युगंधराच्या प्रेरणादायी कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळं शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. दरम्यानच्या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण या ऑनलाईन शिक्षण प्रणालीला मुलं व शिक्षक पहिल्यांदाच सामोरं जाणार होती. पण समाजात असे काही शिक्षक आहेत, की जे कोणतीही जबाबदारी पेलण्यास मागं हटत नाहीत. त्यातीलच एक मूळच्या धामणेर येथील व सध्या देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या अश्विनी क्षीरसागर यांनी लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं.. पण या विद्यार्थ्यांची कहाणी तशी सोपीच होती..
याप्रमाणेच अश्विनीताईंनी इ. पहिलीत शिकणार्या युगंधरा तोडकर या अंध विद्यार्थिनीला शिक्षणाच्या प्रवाहात आणून तिच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी अश्विनीताईंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच युगंधराच्या शैक्षणिक प्रवासाबाबत अश्विनीताई सांगतात, मला पहिल्यापासून सामान्य विद्यार्थ्यांना शिकवण्याची सवय होती. पण युगंधरा तोडकर या अंध विद्यार्थिनीने इ. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्या वेळी मला प्रश्न पडला की, या विद्यार्थिनीला कसं शिकवायचं. कारण, अंध विद्यार्थ्यांना शिकवायचं हे माझ्यासाठी नवीनच होतं. पण मी घाबरले नाही. यामध्ये मला युगंधराच्या आईनं व शेख सरांनी मदत केली. मुख्यत: तिचं शिक्षण हे ब्रेल लिपीतून होतं. त्यामुळं मला सर्वप्रथम ब्रेल लिपी शिकावी लागली. हळूहळू मी सामान्य विद्यार्थ्यांना शिकवतात तसं ब्रेल लिपीतून युगंधराला शिकवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातच तिचा तोंडी सराव करण्याचाही प्रयत्न केला.
त्यामुळं तिच्या अभ्यासात हळूहळू का होईना प्रगती होऊ लागली. याचा मला म:नस्वी आनंद झाला. तसेच डिसेंबर 2019 मध्ये ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाईंड’च्या वतीने कराडमध्ये विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेख सरांनी मला फोन करून सांगितलं की, युगंधराला या स्पर्धेत सहभागी करायचे आहे. त्यामुळे तुम्ही तिचा सराव करून घ्याल का? मी अगदी आनंदाने करून घेईन, असे म्हटले. त्यानंतर एकांकिका स्पर्धा निवडली. त्यामध्ये युगंधराला झेपेल असा विषय तिच्या आईने व मी निवडला. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ असा तो विषय होता. एक मुलगी स्वत:च्या भाषेत सादरीकरण करते, असा त्या विषयाचा संदर्भ होता. या विषयाच्या अनुषंगाने मी तिचा वर्गामध्ये सराव करून घेतला. यादरम्यान मला खूप अडचणी आल्या. कारण, एकांकिकामध्ये सादरीकरणाला जास्त महत्त्व असते. तरीही मी न डगमगता युगंधराला हातवारे करून तिचा स्पर्धेच्या अनुषंगाने परिपूर्ण सराव करून घेतला. त्यानंतर एकांकिका स्पर्धा कराडमध्ये पार पडली. या स्पर्धेत युगंधराने सुंदर असे सादरीकरण करून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. पण तिचे हे सादरीकरण पाहायला मी तिथे उपस्थित नव्हते, ही खंत मात्र मनात कायम आहे. पण तिची आई मला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास आवर्जून घेऊन गेली. या वेळी बक्षीस स्वीकारताना युगंधराच्या चेहर्यावरील आनंद अश्विनीताईंच्या परिश्रमाची जाणीव करून देत होता.
तसेच युगंधरा इंडियन टॅलेंट सर्च (खढड) सन 2019-20 या स्पर्धा परीक्षेला बसली होती. त्या परीक्षेमध्येही तिचा जिल्ह्यात सातवा क्रमांक आला. यामध्येही युगंधराला अश्विनीताईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशा शिक्षणाचे व्रत जोपासणार्या अश्विनीताईंचे कार्य खरंच कौतुकास्पद असून, त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे सामान्य विद्यार्थ्यांसह अधं-अपंग विद्यार्थीही आपल्या कलाकौशल्याच्या जोरावर पुढे जात आहेत. त्यामुळे अश्विनीताईंच्या तंत्रस्नेही शिक्षिका समाजात असतील तर एकही अंधही विद्यार्थी-विद्यार्थिनी मुक्त व्यासपीठापासून वंचित राहणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सेल्फी विथ सक्सेस...
अश्विनीताईंनी डिजिटल शाळेला मनोरंजक बनवण्यासाठी ‘सेल्फी विथ सक्सेस’ हा उपक्रमही राबवला. या उपक्रमात त्यांनी मुलांना सांगितले की, तुम्ही दिवसभरात जे काही काम कराल. त्यासोबतच्या कामाचा आनंद वाटणारा प्रसंग एक सेल्फी काढून पाठवायचा. मुलंही त्या कामात समरस होऊन फोटो पाठवत राहिली. त्यामुळं या मजेशीर उपक्रमाने मुलांचा काम करताना उत्साह वाढत गेला व त्यांच्या स्वत:च्या ‘विश्वासा’चं रूपांतर ‘आत्मविश्वासात’ झालं. यामुळं मुलं एका अर्थानं डिजिटल शाळेच्या माध्यमातून तंत्रस्नेही झाली अन् नित्यनेमानं अभ्यासही करू लागली. तसेच अश्विनीताईंनी डिजिटल शाळेच्या प्रवाहात असताना पालक व विद्यार्थ्यांना ज्या शंका येत होत्या, त्यांचेही त्यांनी निरसन केले.विविध उपक्रमांतून विद्यार्थी झाले तंत्रस्नेही..
अश्विनीताईंनी डिजिटल शाळेच्या माध्यमातून ऑनलाईन छंद जोपासण्याचा प्रयत्न केला असून, त्यामध्ये त्यांनी गणेशोत्सव काळात रांगोळी, चित्रकला स्पर्धा आदींचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. विद्यार्थीही या स्पर्धेत आनंदाने सहभागी होत घरातील गणेशमूर्ती समोर रांगोळी काढून तिचे फोटो अश्विनीताईंच्या मोबाईलवर पाठवत असत. त्यातूनच मुलांमध्ये रांगोळी-चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यामुळे एकंदरीतच या विविध उपक्रम व छंदामधून विद्यार्थीही अश्विनीताईंप्रमाणे ‘तंत्रस्नेही’ झाल्याचे पाहावयास मिळाले. तसेच युंगधरा व तिच्या आईने ‘यूज अँड थ्रो’च्या पाणी पिण्याच्या ग्लासपासून सुंदर असे आकाशकंदील बनवले होते. ते आकाशकंदील आजही शाळेच्या दरवाजावर अभिमानाने लटकताहेत, ही युगंधराची कौतुकास्पद बाब सांगायला अश्विनीताई विसरल्या नाहीत.