धकाधकीच्या अन् वेगवान धावत्या आयुष्यातून वेळ काढून महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेले भोंदवडे येथील पेशाने शिक्षक असलेले दयानंद पवार हे 1985 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षांपासून परळी खोर्यातील मुली-महिला सक्षम व्हाव्यात तसेच येणार्या सर्व परिस्थितीशी निर्भिडपणे सामोरे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य करताहेत.
अंकिता राऊत
सोनवडी : धकाधकीच्या अन् वेगवान धावत्या आयुष्यातून वेळ काढून महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेले भोंदवडे येथील पेशाने शिक्षक असलेले दयानंद पवार हे 1985 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षांपासून परळी खोर्यातील मुली-महिला सक्षम व्हाव्यात तसेच येणार्या सर्व परिस्थितीशी निर्भिडपणे सामोरे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य करताहेत.
परळी खोरे भाग हा दर्या-खोर्यांचा, धबधबे अन् धरणांचा यामुळे कोणती परिस्थिती कधी उद्भवेल सांगता येणार नाही. त्यामुळे दयानंद पवार हे गेल्या 35 वर्षांपासून शाळेतील मुलींना मोफत पोहोण्याचे प्रशिक्षण देताहेत. तसेच स्वयंरोजगार निर्मितीकरिता मोफत टेलरिंग क्लासेस घेण्यात येत आहेत.
तसेच सध्या महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत संभ्रमावस्था असल्याने त्यांनाच सक्षम करण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधत कोरोना काळातील नियमांचे पालन करीत अल्प दरात जुडो-कराटे क्लासेस ते सुरू करणार आहेत.
परळी भागातील मागासवर्गीय महिला मुलींना शहरी मुलांप्रमाणे खडाखड इंग्लिश बोलता यावे, याकरिता इंग्लिश अॅकॅडमी मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीतर्फे भविष्यकाळात महिला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम तसेच एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रम तसेच मुलींना ट्रेकिंग करत भागातील दर्या-खोर्यातील अलिप्त होणार्या घटकांची माहिती करून देणार असल्याचे दयानंद पवार यांनी सांगितले.
मुलींना दिले जातेय मोफत मल्लखांब प्रशिक्षण
ग्रामीण भागातील मुला-मुलींनी शेतात खितपत पडणार्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता परळी खोर्यातील मुला-मुलींना मल्लखांब प्रशिक्षण देऊन तालुका, जिल्हास्तरीय तसेच मोठ्या स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवला आहे.